व्हीएसआरएस मराठी न्युज -विनाकारण रोडवर फिरून शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थींनी किंवा नागरिकांना त्रास देणाऱ्या रोडरोमीओंवर आयुक्तालयातर्फे वेळोवेळी कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी 67 शाळा व महाविद्यालयाच्या आवारात फिरणाऱ्या 25 रोडरोमीओंवर महाराष्ट्र पोलीस ऍक्टनुसार कारवाई करण्यात आली.
तर दोघांवर भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. तर, 153 जणांवर विनाकारण परिसरात मोटार घेऊन फिरत असल्याने कारवाई केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 38 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. यापुढेही आयुक्तालयाकडून अशी कारवाई केली जाणार असून रोडरोमीओंकडून छेडछाड किंवा इतर अनुचित प्रकार आढळल्यास पोलीसांकडे तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Discussion about this post