व्हीएसआरएस मराठी न्युज -अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेर स्वप्नपुर्ती हौसिंग सोसायटीच्या मागून MIDC च्या जागेतून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू होणार आहे त्याचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.
तत्कालीन नगसेवकानी हा रस्ता मंजूर होणेकामी अनेक प्रयत्न केले मात्र त्यावेळी ह्या रस्त्यासाठी अवघे 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.हा विषय माजी महापौर आर एस कुमार यांनी व स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला लागलीच महानगरपालिका आयुक्तासोबत बैठक घेऊन ह्या रस्त्यासाठी वाढीव निधी मंजूर करावा अशी विनंती केली व त्याला 2 कोटी रुपये इतक्या निधीची मंजुरी आणली या कामाचे भूमिपूजन आमदार बनसोडे ,माजी उपमहापौर शैलजाताई मोरे,विरोधी पक्षनेते नगरसेवक राजू मिसाळ,मा नगरसेवीका शर्मिलाताई बाबर,मा महापौर आर एस कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अ क्षेत्रीय कार्यलयाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी योग्य तो पाठपुरावा करून सहकार्य केल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले व काम योग्य वेळेत व दर्जेदार व्हावे यासाठी सूचना केल्या.
प्राधिकरण भागात वेगवेगळी विकासकामे सुरू आहेत त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे येत्या काळात पूर्ण होणार आहेत.आजच्या या भूमिपूजन कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते समीर जावळकर,सामाजिक कार्यकर्त्या साने मॅडम,प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाचे सुभाष जोशी , स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी चे प्रतिनिधी सायकर व इतर रहिवाशी उपस्थित होते.
Discussion about this post