व्हीएसआरएस मराठी न्युज मोशी-किसान प्रदर्शनाचे उदघाटन बुधवारी १४ तारखेला सकाळी ९ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वर्षी किसान प्रदर्शन मोशी येथे नवीन बनत असलेल्या अद्ययावत खुल्या प्रदर्शन केंद्रात होत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे विकसित होत असलेले ह्या केंद्राचे काम बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे.
प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी, मोबाईल अॅपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क रु. १५०/- आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा किसान मोबाईल अॅपवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. (रु. १००) पूर्वनोंदणीची संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.
१५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, ५ दिवसांमध्ये देशभरातून दिड लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०- ३०२५२००० / www.kisan.in
Discussion about this post