व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: दि.२६ आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी दिवशी वारकर्यांमध्ये मोठा उत्साह असला तरीही वर्षभरातील इतर एकादशी दिवशी देखील विविध व्रतं पाळली जातात.
दरम्यान आज २६ मे दिवशी वैशाख कृष्ण एकादशी म्हणजे अपरा एकदशी आहे. अपरा एकादशी अचला एकादशी म्हणून देखील ओळखली जाते.अपरा एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश होऊन स्वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा होतो अशी धारणा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी भगवान विष्णूची आराधना करून पापांमधून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. काही जण दिवसभर उपवास करून विष्णूसहस्त्रनामावलीचं पठण करतात.याच एकादशी व गुरुवार चे औचित्य साधून हजारो भाविकांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.मंदिरात,मंदिरा बाहेर व घाटावरती फराळाचे पदार्थ ,केळी वाटताना काही नागरिक दिसत होते.अनेक भाविकांची इंद्रायणी घाटावरती गर्दी दिसत होती.अनेकांनी पवित्र इंद्रायणी नदीत स्नान ही करत होते.माऊली मंदिरात सायंकाळी श्री देहूकर फड यांची कीर्तन सेवा ही संपन्न झाली.मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट केली होती.
आज दिवसभर मोठया प्रमाणात रस्त्यावर रहदारी दिसली.सायंकाळी मरकळ चौक ते नक्षत्र मंगल कार्यलयाच्या पुढे काही अंतरावर असणाऱ्या मंदिरा पर्यंत मोठी लांब पर्यंत वाहतूक कोंडी दिसून आली.
Discussion about this post