व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -एका मंत्री महोदयांच्या दाताच्या उपचारासाठी आणि सुरक्षेसाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. शेवटी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत या मंत्री महोदयांच्या दातांनी उपचार पद्धती पार पडली आणि ते मार्गस्थ झाले. मंत्री महोदय सुखरुप मार्गस्थ होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलीसांचा तर जीव भांड्यात पडला. विशेष बाब म्हणजे या घटनेची कोठेही वाच्यता होवु नये. याकरिता पूरेपूर खबरदारी घेत माध्यम प्रतिनिधींना मज्जाव केला जात होता. हि घटना आकुर्डी येथे शनिवारी (ता. १७) रोजी दुपारी चार ते पाच दरम्यान घडली आहे.
शनिवारी (ता. १७) रोजी आकुर्डीत उपचार करण्यासाठी आले तेव्हा माध्यम प्रतिनिधींना तेथे फिरकण्यास पोलीसांकडुन मज्जाव करण्यात आला असावा.
Discussion about this post