व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दुरगामी व सकारात्मक परिणाम करणा-या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महापालिका सात्यत्याने प्रयत्न करीत आहे.
याकामी महापालिकेमार्फत शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अर्बन फ्रेमवर्क आऊटकम्स २०२२ च्या अनुषंगाने आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा, पाणी व्यवस्थापन, गृहनिर्माण, शिक्षण , स्थापत्य, उद्यान, वैद्यकीय, पर्यावरण, हॉकर्स झोन आदी क्षेत्रात महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांबाबत पारदर्शक आणि सर्वसमावेशक डेटाबेस तयार करून त्याद्वारे सर्व उपक्रमांबाबतची कार्यवाही तसेच प्रगती योग्य पद्धतीने नियोजन करण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी विविध विभागप्रमुखांची आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले, सर्व सेवासुविधांचा डेटाबेस अर्थात अद्ययावत माहिती महापालिकेकडे संकलित असणे आवश्यक आहे. तसेच ही माहिती सर्व शासकीय यंत्रणेस, शहरातील नागरिकांना, उद्योग क्षेत्राला विविध माध्यमांद्वारे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणे गरजेचे असते. त्यामुळे महापालिका राबवित असलेले उपक्रमांची माहितीची पारदर्शकता नागरिकांमध्ये तसेच सर्व शासकीय यंत्रणेमध्ये वाढण्यास मदत होणार आहे, असे सांगून याकामी महापालिकेच्या सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावा असेही जगताप म्हणाले.
Discussion about this post