व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी(प्रतिनिधी)
आषाढी कामिनी एकादशी नियमित बैठकी मध्ये श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था आळंदी देवाची या संस्थेच्या विश्वस्तपदी विद्यानंद मानकर यांची नियुक्ती करण्यात आली.
खजिनदार पदी माजी अध्यक्ष विलास भालेराव,
उपाध्यक्ष पदी ग्रंथमित्र रमेशराव सुतार
कार्याध्यक्ष पदी दत्तात्रय सुतार
सह सचिव पदी विश्वस्त चंद्रकांत कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब टकले यांनी सर्वांची निवड जाहीर करून सर्वांचा सत्कार केला. प्रसंगी जेष्ठ विश्वस्त व मा. अध्यक्ष ज्ञानेश्वर बबनराव सुतार, सचिव भागवत, ह.भ.प. संतोष महाराज ताजणे, विश्वस्त मनोहर कदम, विश्वस्त दगडू काळे, विश्वस्त सुधाताई चव्हाण, विश्वस्त माधव पांचाळ, विश्वस्त दिलीप सुतार, स्विकृत विश्वस्त रखमाजी जाधव , दिंडी सचिव रंगनाथ बारवकर, दिंडी विश्वस्त ज्ञानेश्वर धर्माधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post