व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी(प्रतिनिधी) पिं.चिं. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शहरातील आदर्श शाळा, गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सोहळा शनिवार दि. ०९.१२.२०२३ रोजी दु. ३.०० वा. कॅम्प एज्युकेशन सोसायटी प्राधिकरण, निगडी येथे आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमास पुणे जि. प. शिक्षणाधिकारी (माध्य.) सुनंदा वाखारे प्रमुख पाहण्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पद्मश्री गिरीश प्रभुणे भूषविणार आहे.
तसेच यावेळी प्रसिदध व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांचे व्याख्यान होणार आहे .
यावेळी पुणे जि.प. माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असेल
अशी माहिती पिं.चिं. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष कैलास पवळे, सचिव संभाजी पडवळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
Discussion about this post