व्हीएसआरएस मराठी न्युज –मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात भारतीय मानक ब्युरो क्लब (BIS Standared Club) अंतर्गत दिनांक १२ व १३ डिसेंबर २०२२ रोजी मामासाहेब मोहोळ महाविद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी महाविद्यालयातील बी. आय. एस. क्लब मार्फत विद्यार्थी व पालकांना बी.आय.एस. क्लब ची माहिती देण्यात आली. बी. आय. एस. क्लब समन्वयक प्रा. शिंदे एम.डी. यांनी बी.आय. एस. क्लब चा उद्देश स्पष्ट करून सांगितला. वस्तू खरेदी करत असताना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. क्लब च्या विद्यार्थ्यांनी आलेल्या पालकांना विविध वस्तूंवरील मार्क, आय.एस.आय. मार्क, गोल्ड हॉलमार्किंग याविषयी माहिती सांगितली.
तसेच विद्यार्थ्यांनी बी.आय.एस. च्या वेगवेगळया लोगो च्या रांगोळ्या प्रदर्शित केल्या. यावेळी क्लबच्या विद्यार्थ्यांनी पॉवर पॉईट प्रेझेंटेशनचा उपयोग करून बी.आय.एस. केअर ॲप विषयी आलेल्या पाहुण्यांना माहिती सांगितली व बी.आय.एस. केअर ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.
यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, डॉ. श्रीकांत जगताप, प्राचार्य एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, सिंहगड रोड, पुणे तसेच माहविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सातव जी.पी., कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. भोईटे एस.व्ही., व्यवसाय अभ्यासकम विभागप्रमुख प्रा. शिंदे ए. डी. व कनिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post