व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पिंपरी व आकुर्डी येथील प्रकल्पांत ९४८ सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे दहा हजार १०८ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. दरम्यान, महिन्याभरात सोडत काढण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांकडून दि. २८ जूनपासून अर्ज मागविण्यास महापालिकेने सुरूवात केली. या प्रकल्पांतर्गत आकुर्डी येथे ५६८ तर पिंपरी येथे ३७० सदनिका उभारण्यात आल्या आहेत. तर पिंपरी येथील ३७० सदनिकांसाठी ४,६३८अर्ज भरले. अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती. यासाठी अंतिम अर्ज सादर करण्याची मुदत २७ ऑगस्टपर्यंत होती. या मुदतीमध्ये हे अर्ज प्राप्त झाले. आकुर्डी येथील ५६८ सदनिकांसाठी ६६९३ लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर महिनाभरात लाभार्थी अंतिम करण्यात येतील. त्यानंतर सोडत काढणार आहे.
– • अण्णा बोडदे, सहायक आयुक्त
Discussion about this post