व्हीएसआरएस मराठी न्युज –दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी श्री. सुहास एकनाथ सामसे उद्यान सहायक (पिंपरी चिंचवड मनपा) यांना रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास कटफास्ट कंपनी, एफ-२ ब्लॉक, वंडरकार शोरूम जवळ, एमआयडीसी पिंपरी, पुणे येथे विनापरवाना वृक्षतोड करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीची ४ मोहोगणीची झाडे, १ कांचनची झाडे, १ केशियाचे झाड, १ रेनट्रीचे झाड तसेच कंपनीच्या आतील १ आब्यांचे झाड अशी एकूण ८ झाडे तोडण्यात आली आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन एमआयडीसी, पोलिस ठाणे भोसरी यांनी लाकडांचा भरलेला ट्रक ताब्यात घेतला असून आरोपी विरोधात महाराष्ट्र झाडे तोडणे ( नियमन) अधिनियम १९६४ कलम ३(१) आणि ४ तसेच महाराष्ट्र ( नागरी क्षेत्रे) झाडांचे सरंक्षण व जतन अधिनियम १९७५ कलम २१(१) अंतर्गत कारवाई केली.
Discussion about this post