व्हीएसआरएस मराठी न्युज –भाजप ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भव्य स्वरूपात ओबीसी जागर अभियानास निगडी येथून शुभारंभ करण्यात आले.
दिनांक 06-04-2022 रोजी भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजपा ओबीसी मोर्चा पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने भाजपा महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेश आण्णा टिळेकर व भाजप पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे,आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी जागर अभियानास निगडी येथून भव्य स्वरूपात सुरुवात झाली.
याप्रसंगी यमुनानगर निगडी प्रभागातील सफाई महिला कर्मचाऱ्यांचा, कष्टकरी महिलांचा, महिला बचत गटातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान शाल, श्रीफळ, गुला पुष्प देऊन करण्यात आला. तसेच सर्वांना एकत्र घेऊन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा संपूर्ण शहर भर ओबीसी जोडो अभियान राबवणार असून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरांमध्ये विविध कार्यक्रम घेणार आहे. ओबीसी जागर अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी
नगरसेवक उत्तम केंदळे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ऋषीकेश भाऊ रायकर, सामाजिक कार्यकर्ते बाप्पूसाहेब घोलप, प्रभाग अध्यक्ष रंगनाथ पवार, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राजेश डोंगरे, कैलासजी सानप, योगेशजी आकुलवार, शंकरदादा लोंढे, नेहुलजी कुदळे, नितीन साळी, अभिषेक करपे,अनिल वाणी, रमाकांत पाटील,शेखर आजरकर, गिरीश देशमुख, शिरीष जेधे,आदित्य कुलकर्णी, प्रथमेश आंबेरकर, चंद्रकांत शेंडगे, बाबा परब, भगवान श्रद्धे काका, अनिल साळुंखे,ओमकार हिंदळेकर, सविताताई करपे, विमलताई काळभोर,जयश्रीताई देशमाने, किरणताई पाचपांडे, लताताई हिंदळेकर, रोहिणीताई साळुंखे,आरतीताई बावणे, जयश्रीताई मकवाना, स्मिता देशमाने, ऋतुजा देशमाने,मोनाली रंगमाले, निवेदिता हिंदळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ओबीसी जागर अभियान कार्यक्रमाचे प्रस्तावना ओबीसी मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर यांनी मांडली तसेच या अभियानाला माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी शुभेच्छा व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन साळी यांनी केले तसेच आभार मनिषाताई पाटील यांनी मानले.
Discussion about this post