व्हीएसआरएस मराठी न्युज –२६ ऑक्टोबर रोजी एक दिवसाच्या महाराष्ट्र आणि गोवा दौऱ्यावर असणार आहेत. पंतप्रधान मोदी हे या दौऱ्यात दुपारी एक वाजता शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन आणि पूजा देखील करणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे .
२०२३ पिंपरी चिंचवड शहरातील निगडी तळवडे रावेत किवळे बोपखेल कासारवाडी फुगेवाडी दापोडी दिधी बोपखेल पिंपरी भोसरी गावांमध्ये रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र २००० पाड क्षेत्र कमी करून ५०० मीटर करण्यात यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुणे जिल्हाधिकारी साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना लेखी पत्राद्वारे रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब शिर्डी दौऱ्यावर येत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार.
अहमदनगर जिल्हाधिकारी साहेब ह्यांना ईमेल आयडी वर तक्रार दाखल केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना तक्रार दाखल केली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ह्यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे असे सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन द्वारा सांगितले आहे.
Discussion about this post