व्हीएसआरएस मराठी न्युज –निगडीतील खंडोबा मंदिरात श्री खंडोबा प्रतिष्ठानच्या मार्तंड भैरव षडरोत्सवानिमित्त (देव दीपावली) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता सोमवारी चंपाषष्ठीच्या कार्यक्रमाने हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत झाली.
षडरोत्सवानिमित्त दररोज पहाटे काकड आरती, भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी चंपाषष्ठी निमित्त पहाटे श्री खंडोबा आणि महादेवाच्या पिंडीला महाअभिषेक करण्यात आला, दुपारी विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ दापोडी यांचा भजनाचा कार्यक्रम, त्यानंतर जागरण गोंधळ तर सायंकाळी महाआरती करण्यात आली. आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सकाळ पासून पंचकृषितील भाविक भक्तांनी मंदिरात येऊन खंडेरायाचे व आयोध्या येथून आलेल्या श्रीराम पूजा मंगल अक्षता व कलशाचे ही दर्शन घेतले अशी माहिती अध्यक्ष तानाजी काळभोर यांनी दिली.
Discussion about this post