व्हीएसआरएस मराठी न्युज -कासारवाडी येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिक झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या व्यक्तींना श्वास घेण्याचा त्रास झाला. काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. पोहण्यासाठी २२ जण आले होते. पैकी, ११ जणांना त्रास झाल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. परिस्थिती अत्यंत भीषण होती. घटनास्थळी काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती देखील मिळत आहे.
या तलावाच्या परिसरात ५०० मीटर पर्यंत क्लोरीन गॅस पसरल्यामुळे तलावाच्या समोरून जाणारा रस्ता पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचलेलं आहे. सध्या मोठी दुर्घटना टाळली असल्याने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.
Discussion about this post