व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -भारत मातेच्या यावर्षीचा १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे घोषित केले. या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसच्या बतीने पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघ मिळून ७५ कि. मी. ची आझादी गौरव पदयात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती माजी महापौर व ज्येष्ठ नेते कविचंद भाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदार संघात प्रत्येकी साधारणता २५ किमी ची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेची सुरवात क्रांती दिनाच्या दिवशी मंगळवारी (दि.०९ ऑगस्ट) पिंपरी विधानसभा मतदार संघातील पुणे मुंबई महामार्गावरील दापोडी येथील शहिद भगतसिंग व हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आझादी गौरव पदयात्रेस सुरवात करण्यात येणार आहे. दापोडी परिसर, फुगेवाडी, कासारवाडी परिसरात ही यात्रा काढण्यात येणार आहे.
तसेच या पदयात्रेचा समारोप सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ८:३० वाजता चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर चौक येथे ७५ मशाली प्रज्वलीत करून व क्रांतिकारकांना अभिवादन करून करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट सोमवारी मध्यरात्री १२:०५ मिनिटांनी क्रांतिवीर चापेकर चौक येथे राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. तसेच ७५ स्वातंत्र्यसेनिकांचा सन्मानही करण्यात येणार आहे असेही डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
महिला काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांनी सांगितले की, या पदयात्रेत महिला काँग्रेसच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या घालून ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनिकांचे औक्षण करून सर्व महिला या पदयात्रेमध्ये सहभागी होतील.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, ज्येष्ठ नेते अशोक मोरे, तानाजी काटे, माजी नगरसेविका निगार बारस्कर, माजी नगरसेवक बाबू नायर, महिला शहराध्यक्षा सायली नडे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवा दल शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआय प्रदेश उपाध्यक्ष अॅड. उमेश खंदारे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मालशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, ग्राहक सेल अध्यक्ष झेविअर अंथोनी, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहितुले, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, भाऊसाहेब मुगुटमल, अर्जुन लांडगे, मेहबुब शेख, चक्रधर शेळके, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे विशाल सरवदे, आशा भोसले, धनाजी गावडे, अण्णा कसबे, उमेश बनसोडे, पांडुरंग जगताप, मिलिंद फडतरे, छापावती देसले काटे रवी कांबळे, किरण खाजेकर, किरण नढे, आकाश शिंदे, विजय ओव्हाळ, जुबेर खान आदी उपस्थित होते.
Discussion about this post