व्हीएसआरएस मराठी न्युज -२०१९ मध्येही पुन्हा भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. जगताप व लांडगे पुन्हा निवडून आले. त्यामुळे शहराला पुन्हा मंत्रीपद मिळण्याची आशा निर्माण झाली. पण, शेवटच्या क्षणी शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी भाजपऐवजी दोन्ही कॉंग्रेसबरोबर आघाडी केली आणि पिंपरी-चिंचवडला मंत्रीपदाने पुन्हा हुलकावणी दिली.
अडीच वर्षानंतर ही संधी पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेतील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बंडामुळे चालून आली आहे. घरातील दोन्ही आमदारांपैकी आमदार महेश लांडगे हे फडणवीसांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील आहेत. त्यातून शहराला प्रथमच मंत्रीपद मिळण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे.
शहरातील महेश लांडगे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरती त्यांना क्रीडा राज्यमंत्री बनवून टाकले. लांडगे समर्थक नेहमी एक पाऊल पुढे असतात. समर्थकांकडून सोशल मीडियावर आमदार महेश लांडगे राज्यमंत्री झाल्याचे अभिनंदन बॅनर व्हायरल केले आहेत.
महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठीच देवेंद्रजी पुन्हा येताहेत : आमदार महेश लांडगे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबाराय आणि पंढरीचा विठुरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली होती की, महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा यावेत. राज्यातील मायबाप जनता आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’’ करतील, याचा विशेष आनंद होत आहे. सन्मानीय फडणवीस यांना भावी वाटचालीस तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.. !
– महेश किसनराव लांडगे,
शहराध्यक्ष व आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.
Discussion about this post