व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यावर नागरिक, राजकीय पक्ष यांच्या हरकती व सूचना मागवन्यात आलया.
या हरकती व सूचनांवर निष्पक्षपातीपणे सुनावणी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती केली आहे. येत्या 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
महानगरपालिकेतील सूचना व हरकतीचा अहवाल 2 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला पाठवायचा आहे. प्रत्येक हरकतीची स्वतंत्र सुनावणी घेतल्यास मुदतीत हे काम होणार नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी एक प्रकारच्या अथवा काही विशिष्ट प्रभागांशी संबंधित विविध व्यक्तींकडून हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. अशा हरकतदारांची मागणी एक प्रकारची असल्यास, त्या सर्व हरकतदारांचा एक गट करून सुनावणी घ्यावी असे आदेश आयोगाने दिले आहेत.
Discussion about this post