व्हीएसआरएस मराठी न्युज चिखली-पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि चिखली- मोरेवस्ती भागातील सर्वसामान्य जनतेचा आधारवड अशी ओळख असलेल्या माजी नगरसेवक स्व.दत्ताकाका साने यांची जयंती मोफत आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित आपल्या लाडक्या काकांना अभिवादन करण्यासाठी तब्बल १५१ दात्यांनी रक्तदान केले. दरम्यान, या शिबिरात जमलेल्या असंख्य नागरिकांची दत्ताकाकांचे चिरंजीव यश यांनी आस्थेने विचारपूस केली. नागरिकांसोबत त्यांनी साधलेला संवाद आणि एकूणच यश यांचे वागणे पाहून काका आमच्यातून गेलेले नाहीत. ते आजही यशच्या रूपाने आमच्यात आहेत, अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.
आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद या आरोग्य शिबिरात आरोग्य क्षेत्रातील विविध संस्थांनी स्वयंस्फूतीने नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची तयारी दाखविली. यामध्ये १५१ दात्यांनी रक्तदान केले. १८९ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यातील ३५ नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. त्यातील १२ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तर ९८ नागरिकांची रक्त तपासणी आणि २२० नागरिकांच्या संपूर्ण शरीराची मोफत तपासणी करण्यात आली.
Discussion about this post