व्हीएसआरएस मराठी न्युज –
मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी (15 मे) संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
नितीन गडकरींच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आहे. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याआधीही गडकरी यांना नागपूर येथील कार्यालयात धमकीचा फोन आला होता.
नितीन गडकरींना गेल्या पाच महिन्यांत तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यापूर्वी 14 जानेवारी रोजी नितीन गडकरी यांच्या महाराष्ट्रातील नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात माफिया डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने फोन करून धमक्या देण्यात आली होत्या. फोन करणाऱ्याने दीड तासात तीन वेळा फोन करून धमक्या देण्याबरोबरच १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. नागपूर पोलिसांनी कर्नाटकातील बेळगावी येथील तुरुंगात धमकी देणाऱ्या कॉलरचा नंबर शोधून काढला होता. जयेश पुजारी उर्फ जयेश कंठा असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मार्चमध्ये पुन्हा जयेशच्या नावाने धमकी देण्यात आली होती. यानंतर 21 मार्च रोजी गडकरींना पुन्हा फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नागपूर कार्यालयातच पुन्हा धमकीचा फोन आला होता. त्यानंतरही धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव जयेश पुजारा असल्याचे सांगितले होते. गेल्या वेळी जे घडले नाही ते यावेळेस होईल, असे तो धमकी देणारा म्हणाला होता.
Discussion about this post