व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी येथे पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांना भारत सरकार व स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता असलेला ‘कुडो मार्शल आर्ट’ खेळाचे महत्त्व, शारीरिक
फायदे यांचे मार्गदर्शन आणि स्पर्धा नियम पुणे जिल्हा कुडो संघटने मार्फत देण्यात आले.
या वेळी विद्यालयाचे प्राचार्य सुनील लाडके, उप मुख्याध्यापक सुधीर रोकडे, पर्यवेक्षिका सिंधू उपप्राचार्य खुशालदास मोरे, उपप्राचार्य गायकर यांनी मेजर ध्यानचंद यांची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात केली. पुणे जिल्हा कुडो संघटना अध्यक्ष अरविंद मोरे,सचिव राकेश यादव, कुडो रेफ्री लेखा लोखंडे, श्रुती सुर्वे, ब्लॅक बेल्ट ऋषिकेश जाधव, अंजली सपाटे, धनश्री कोळी, समृद्धी खंदारे, शर्वरी हेंडवळे, वैदेही फडतरे, श्रीदुला कोळी, निशांत पंचमुखे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे कुडो मार्शल आर्ट काय आहे, त्याची नियमावली काय आहे, त्याचा फायदा काय आहे हे शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
Discussion about this post