व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-काल वीणा मंडपातून माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होऊन काल रात्री आजोळ घरी गांधीवाडयात मुक्कामी गेली होती. आजोळ घरी काल रात्रीपासून आज पहाटे पर्यंत माऊली पालखी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
आज आजोळ घरी गांधी वाड्यात पहाटे माऊलींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर माऊलींच्या पालखीत श्रींच्या /माऊलींच्या प्राणप्रतिष्ठापीत करण्यात आलेल्या पादुका पालखीत प्रतिष्टापित करण्यात आल्या. त्यानंतर ग्रामस्थ खांदेकऱ्यांनी गांधीवाड्यातून पालखी खांद्यावर घेत नगरपालिका चौक येथे असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथा पर्यंत माऊली माऊली च्या जयघोषात माऊलींची पालखी नेण्यात आली. तद्नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोन्या माऊली ही वरखडे कुटुंबियांची बैलजोडी जुपलेल्या रथात म्हणजेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा रथात ठेवण्यात आली. यावेळी तहसीलदार वैशाली वाघमारे, आळंदी आ.न.पा. मुख्याधिकारी अंकुश जाधव व आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पालखी व रथ दोन्ही आकर्षक रित्या फुलांनी सजवले होते.
अनेक भाविक पालखी रथाचे दर्शन घेत होते.
माऊलींची पालखी रथात ठेवल्या नंतर सकाळी साडे वाजता पंढरपूर च्या दिशेने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ मार्गस्थ झाला.
यावेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर पालखी रथाचे सारथी पांडुरंग वरखडे,संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई हे होते.
आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी चा मुक्काम पुणे येथे होणार आहे.
Discussion about this post