व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आकुर्डी गावातील पांढरकर वस्ती येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. माजी नगरसेवक निलेश आप्पा पांढरकर व आकुर्डी गावचे ज्येष्ठ नागरिक बाजीराव काळभोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक निलेश पांढरकर म्हणाले की, आज आपण आपल्या भारत देश स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या प्रवासाकडे वळून पाहतो तेव्हा आपले हृदय अभिमानाने आणि सन्मानाने भरून येते. कारण, एकता आणि सद्भावनेचा विचार सोबत घेऊन सर्व जातीत धर्माचे बांधव एकत्र रहात आहेत.
त्याप्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पांढरकर, भास्कर नारखडे, राहुल जाधव, अॅड. बाबुलाल वाघमारे, अॅड. राजेंद्र काळभोर, क्षीरसागर, शरद जगताप, लजपत प्रजापती, अशोकराव पांढरकर, सारिका जाधव, सोनाली वाल्हेकर, प्राजक्ता पांढरकर, रंजना बहिरट, केतकी डेडसेना, पार्वती बुरुड, मनीषा चौधरी, सलोनी शर्मा, स्नेहल घनवट यांच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post