व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी येथील कॅम्प परिसरात सावली निवारा केंद्र आहे. बेघर लोक या केंद्रात आल्यानंतर त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. दर आठवड्याला त्यांची प्रकृती तपासली जाते. त्यांना सकाळी चहा-नाश्ता आणि दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण दिले जात आहे. या केंद्रात 24 खोल्या असून 100 खाटांची तरतूद आहे. येथे येणाऱ्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे संचालक एम. ए. हुसेन यांनी पिंपरी आयुक्त मा शेखर सिंह, यांना केंद्र बद्दल माहिती देताना सांगितले .
शहरात महापालिकेने पिंपरी कॅम्पमध्ये “सावली’ बेघर निवारा केंद्र सुरु केले आहे.ऑक्टोबर २०२० पासून “रिअल लाइफ रिअल पिपल’या संस्थेतर्फे हे केंद्र चालवले जाते. मानसिक रोगी, निराधार वृद्ध, फुटपाथवर भटकणारे, सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या, शहरातील विविध भागात उघड्यावर आयुष्य जगणाऱ्या बेघरांची या निवारा केंद्रात व्यवस्था केली जाते.
आतापर्यंत २५६ लोकांना या केंद्रा मार्फ़त मदत दिलेली आहे. त्यातील ३० लोकांना त्यांच्या गावाचा शोध घेउन सुखरूप पाठवणी केली आहे. समुपदेशन करून २५ लोकांना नोकऱ्या देऊन सबलीकरण केले आहे.
पिंपरी चिंचवड मनपाने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत भाजी मंडई पिंपरी येथे २०२० साली सावली निवारा केंद्र सुरू केले आहे. येथे एकूण २४ खोल्या आणि १०० खाटा आहेत.
आयुक्त सिंह यांनी केंद्दात राहणारे ६६ नागरिकांच्या बद्दल माहिती घेतली व आज दिवाळी निमित्त त्याच्या हस्ते जेवण देण्यात आले.
त्यावेळी रिअल लाईफ रिअल पीपल संस्थेचे संचालक एम. ए. हुसेन, अविनाश वाघमारे पाटील आदी नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post