व्हीएसआरएस मराठी न्युज –भारतरत्न वंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी होत आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांच्या उत्कर्षाकरिता आयुष्य पणाला लावून त्यांना प्रकाशाची वाट दाखविणारे आणि समता, न्याय व बंधुता या मुल्यांची शिकवण देणारे बाबासाहेब निष्णात अर्थतज्ञ होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यांच्या संकल्पनेतूनच झाली.
भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३१ वी जयंती नगरसेवक दिनेशभाऊ यादव यांच्या जनसंपर्क कार्यालय कुदळवाडी येथे साजरी करण्यात आली यावेळी स्वीकृत नगरसेवक संतोष मोरे, भाऊसाहेब रोकडे, गणेश यादव, प्रकाश चौधरी, विजय तापकीर, सुरेश वाळुंज, श्याम थोरात, शरद गोरे ,दिपक घन, गौरव त्रिपाठी,मोईद शेख,वैभव वाघ, प्रकाश चौधरी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post