व्हीएसआरएस मराठी न्युज निगडी-निगडीपोलीसांनी केलेल्या सखोल आणि बारकाईने केलेल्या तपासामुळे जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने कैद व दंडाची शिक्षा सुनावली आहे. निगडी पोलीसांच्या अशा तपास कार्यामुळे परीसरातील चोरट्यांवर पोलीसांचा चांगलाच जरब निर्माण झाला आहे.
थरमॅक्स कंपनी रोड वरील शेतकरी मळा येथील हटिल समोर (ता. २३) डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. फिर्यादी यांची काळ्या रंगाची अॅक्सस दुचाकी (एम.एच.१४ बीव्ही ६५३५) चोरीला गेली होती. पोलीस हवालदार विलास केकाण यांनी आरोपी चंद्रभान गौतम (वय- २० वर्ष, रा. कुदळवाडी, चिखली) याला (ता.२८) फेब्रुवारी २०२१ रोजी त्याला अटक करुन चोरीची दुचाकी त्याच्याकडुन हस्तगत केली होती. हवालदार केकाण यांनी आरोपी विरुद्ध सखोल व बारकाईने तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्याअनुषंगाने न्यायालयाने त्याला २ वर्ष १ महिना साधी कैद आणि ०५ हजाराचा दंड, दंड न भरल्यास ०५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
संभाजीनगर, चिंचवड येथे (ता. ०१) जुलै २०२० रोजी घडली होती. एकुण ७५ हजाराचा मुद्देमाल चोरुन पोवारा केला होता. पोलीस उप-निरीक्षक वर्षाराणी घाटे यांनी आरोपी अभय देवराव राऊत (रा. खारड, ता. मुदखेडा, जि. नांदेड) यास अटक करुन या प्रकरणाचा सखोल तपास केला. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला दिड महिना साधी कैद व ०५ हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ०५ दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
Discussion about this post