व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी महिला शहराध्यक्षपदी श्रीमती जयश्री देशमाने यांची निवड करण्यात आली.
मुंबई येथे भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार मा. के. लक्ष्मणजी, खा.हंसराजभैय्या अहिर राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा,मा.खा.संगमलाल जी गुप्ता राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भाजपा ओबीसी मोर्चा, मा.आ. चंद्रशेखरजी बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र, अतुलजी सावे सहकार इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष मा.आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.आ.श्री.योगेश अण्णा टिळेकर* यांचे हस्ते पिंपरी-चिंचवड भाजपा ओबीसी महिला शहराध्यक्षपदी श्रीमती जयश्री देशमाने* यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी मा मा.श्री संजय जी केनेकर (प्रदेश प्रभारी भाजपा ओबीसी मोर्चा व भाजपा शहराध्यक्ष संभाजीनगर),सौ. विना सोनवलकर (पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश भाजपा),मा.श्री. ऋषिकेशभाऊ रासकर (पिंपरी- चिंचवड शहराध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा), श्री. राजेश डोंगरे (पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भाजपा युवक ओबीसी मोर्चा), यमुनानगर महिला प्रभाग अध्यक्षा सौ. विमलताई काळभोर, सौ जयश्री मकवाना उपस्थित होते.
Discussion about this post