व्हीएसआरएस मराठी न्युज –सोनी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका “CID” मध्ये फ्रेडीची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले आहे. दिनेश फडणीस यांना गेल्या काही दिवसांपासून यकृताची समस्या होती.
त्यामुळे त्यांना २ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यकृत निकामी झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री 12.08 वाजता त्याचे मुंबईतील कांदिवली येथील तुंगा रुग्णालयात निधन झाले. दिनेश फडणीस यांना यकृताची समस्या होती. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले. मात्र त्यांना वाचवण्यात यश नाही आले.
Discussion about this post