व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -सध्याच्या धावपळीच्या युगात मधुमेह हा सर्वसामान्य आजाराप्रमाणे पसरत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास याचे परिणाम शरीरावर होतात.
आकुर्डीत टोणगांवकर हास्पिटल मध्ये जागतिक मधुमेह दिन निमित्त मोफत मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीरात मा नगरसेवक निलेश पांढरकर यांच्या सह ५० नागरिकांना तपासणी करण्यात आली.त्या वेळी हास्पिटलचे संस्थापक डॉ अनिरुद्ध टोणगांवकर यांच्या मार्गदर्शन खाली डॉ दिनेश कुलकर्णी यांनी तपासणी केली.
विश्व श्रीराम सेना आरोग्यमंच अध्यक्ष अक्रम शेख यांच्या प्रयत्नातुन नागरिकांची ब्लड शुगर तपासणी करण्यात आली.
Discussion about this post