व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -आकुर्डीत चौकात आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात भव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला,
दहीहंडी उत्सवाचे प्रास्ताविक शंकर जगताप यांनी उपस्थित गोविंदांना मार्गदर्शन व दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कैलास कुटे युवा मंच आयोजित भव्य दहीहंडी उत्साहाने साजरा झाले.सर्व वडीलधारी मंडळी, माता भगिनी आणि माझ्या मित्रांनो दहीहंडीच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो आणि मोठ्या उत्साहाने दहीहंडीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला त्यामध्ये आपण खूप मोठी जबाबदारी पेलून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोठा हातभार लावला त्याबद्दल कैलास कुटे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
येथील परिसरातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवक, युवती, महिला व नागरिक या उत्सहात कार्यक्रमात सामील झाले होते.
Discussion about this post