व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी-शहरात दररोज पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी आणि मनपातील सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पार्टी तर्फे हंडा मोर्चा चे आयोजन करण्यात आले . यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसह असंख्य महिलांकडून महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला . सत्ताधारी भाजप च्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला .
पिंपरी चिंचवड मनपाच्या सार्वत्रिक निवडणूकांचा बिगुल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना वेठीस धरण्याचे काम मनपातील सत्ताधारी भाजप करीत आहे. मागील वर्षी पवना धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असतानाही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नुकतेच पूर्ण शहरभर दररोज पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहे. तरीदेखील शहरात ठिक ठिकाणी अद्यापही टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील दाट वस्ती व झोपडपट्ट्यांमधील कमी दाबाने व अनियमितपणे पाणी पुरवठा होत आहे.
यामुळेच शहरात दररोज पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी आणि मनपातील सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पार्टी तर्फे हंडा मोर्चा चे आयोजन करत कार्यकर्त्यांसह असंख्य महिलांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला . सत्ताधारी भाजप च्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला .
Discussion about this post