व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – दि-२३ मार्च २२(बुधवार) बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्यपाल भगतसिंग काेशीयारी यांच्या हस्ते राष्ट्रगाैरव पुरस्कार देवुन सन्मान करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण माेरे सभागृहात येत्या रविवारी (२७ मार्च) हा सत्कार साेहळा पार पडणार आहे.
आमदार असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रा काढून प्रत्येक गावात संविधानाच्या प्रतीचे वाटप करत लाेकांना संविधानाचे महत्त्व समाजावून सागितले त्यांच्या या कार्याची दखल घेवून सपकाळ यांना हा सन्मान दिल्या जाणार आहे.
डाँ. लालबाबु गुप्ता अध्यक्ष असलेल्या विश्व मैत्री संघ या सामाजिक संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर, जिल्हयासंह संपुर्ण महाराष्ट्रात या संघटनेचे कार्य काैतुकास्पद आहे. युवा सामाजिक कार्यकर्ते अक्रम शेख हे या संघटनेच्या माध्यमातून सक्रियपने समाजकार्य करत असतात. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह उल्लेखनीय कामगिरी केलेल्या देशभरातील नामवंत मंडळीचा सन्मान सुध्दा यावेळी हाेणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांचा राज्यपालांच्या हस्ते हाेणारा सत्कार हा बुलढाणा जिल्ह्यातील जनतेसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.
Discussion about this post