व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -आकुर्डी येथील कैलास कुटे युवा मंच यांच्या वतीने आकुर्डी मधील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी देऊन सन्मानित करण्यात आले व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाळी सण हा फक्त दिव्यांचा उत्सव नसून तो तिमिरातून प्रकाशाकडे नेणारा ऊर्जास्रोत्र आहे हा उत्सव सर्वांच्याच घरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र वर्षभर आपला परिसर स्वच्छ ठेवून समाजाला निरोगी ठेवण्याचे काम विविध विभागातील स्वच्छता कामगार करत असतात त्यांच्याच कामाचा सन्मान म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री कैलास गणपत कुटे यांनी स्वच्छता कामगारांसोबत मिठाई व शुभेच्छा देऊन दीपावली साजरी केली
Discussion about this post