व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -दि. ०९ डिसेंबर २०२२ रोजी खराळवाडी, पिंपरी येथे पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेसच्या नेत्या त्यागमूर्ती खासदार श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त व अभिष्टचिंतन सोहळयानिमित्त आरोग्य व सफाई महिला व पुरुष कर्मचारी यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
महिला बचत गट सक्षमीकरणासाठी महिला बचतगटांना आर्थिक मदत करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिक संघटनांना आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, मा. शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहितुले, मा. नगरसेविका सौ. निर्मलाताई सदगुरू कदम, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, सेवादल अध्यक्ष विरेंद्र गायकवाड, मागासवर्गिय सेल अध्यक्ष विजय ओव्हाळ, अर्जुन लांडगे, डॉ. मनिषा गरुड, आशा भोसले, स्वाती शिंदे, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, रिटा फर्नांडिस, सीमा हलकट्टी, प्रियंका मलशेट्टी, बाबा बनसोडे, प्रा. किरण खाजेकर, मेहबूब शेख, पांडुरंग जगताप, इरफान शेख, मिलिंद फडतरे, सचिन सोनट्टके, झुबेर खान, आण्णा कसबे, नितीन खोजेकर, दीपक भंडारी आदिसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post