व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय आणि स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फ्रीडम टू वॉक सायकल रन’ मोहीम राबविण्यात आली होती. मोहिमेतील पहिल्या भागात देशपातळीवर यश संपादन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वैयक्तिक पातळीवर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता अमित दिक्षित यांनी सायकलिंगमध्ये प्रथम क्रमांक व संगणक चालक अनंत चुटके यांनी चौथा क्रमांक पटकावला. तसेच रनिंगमध्ये कनिष्ठ अभियंता प्रसाद देशमुख यांचा देशात द्वितीय क्रमांक व स्वप्नील शिर्के यांनी पाचवा क्रमांक पटकावला आहे.
Discussion about this post