व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते JW Mariot येथे सकाळ समुहातर्फे डॉ अनिरुद्ध टोणगांवकर यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार कार्यक्रम पार पडला.
टोणगांवकर सतारा जिल्ह्यातील कराडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी शिकून पुढे पुण्याच्या बी. जे. मेडीकल कॉलेजमधून एमडी डीएनबी करून पिंपरी चिंचवडमधील एक यशस्वी फिजिशियन व मधुमेहतज्ज्ञ असे नाव कमावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे निगडीतील स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डायरेक्टर डॉ. अनिरुद्ध अरविंद टोणगांवकर .
मध्यमवर्गीय परिस्थितीतून सुरुवात करून कष्ट, मेहनत आणि प्रामाणिकपणा याच्या जोरावर पिंपरी-चिंचवड परिसरात भरपूर नाव कमावले. आपले वडील श्री. अरविंद टोणगांवकर यांची इच्छा डॉक्टर बनून डॉ. अनिरुद्ध यांनी पूर्ण केली तर आपले आई, वडील व आजोबांच्या इच्छेला मान दिला डॉ. दीपाली यांनी. सुरुवातीला बँकेतून कर्ज काढून निगडी येथे बी. जी. कॉर्नरल स्वतःचे क्लिनिक चालू केले. ते ससून जनरल हॉस्पिटलमधील नोकरी सोडून जवळपासच्या ३० ते ४० जनरल प्रॅक्टिशनरकडे रात्री, अपरात्री, दुचाकीवर दोन्ही पायात ECG मशिन ठेवून.ऊन, पाऊस याची पर्वा न करता अहोरात्र पेशंट तपासले. पुढे मग आकुर्डी येथे स्वतःचे ऑपरेशन थिएटरसहित सुसज्ज असे २० बेडचे टोणगांवकर हॉस्पिटल यशस्वीपणे सुरू केले. डॉ. दीपाली तर हॉस्पिटलबरोबरच दोन मुले, संसार सुरुवातीला डी. वाय. पाटील कॉलेज पिंपरी येथील नोकरी अशी तारेवरची कसरत करीत ती किमया साधली. दोन्ही मुलांच्या शैक्षणिक व इतर सर्व क्षेत्रातील यशामागे डॉ. दीपाली यांचाच सिंहाचा वाटा आहे, हे वेगळे सांगायचीच गरज नाही.
खरतर हा सर्व प्रवास अतिशय खडतर होता, पण जिद्द, कष्ट व प्रामाणिकपणा या जोरावर ही वाटचाल शक्य झाली. नियमित, शिस्तबद्ध जीवनशैली, व्यायामाची आवड ही दोघांच्याही आयुष्याची विशेषणे आहेत. डॉ. अनिरुद्ध गायन, चित्रकला व रनिंग (दहा किलोमीटर. २१ किलोमीटर मॅरेथॉन) यात पारंगत आहेत, तर डॉ. दीपाली यांना डान्स, रांगोळी, संगीत व कुकिंगची विशेष आवड आहे. ‘जोडावे सकळजन’ हा त्यांच्या आयुष्याचाच मंत्र आहे.
समाज निरोगी असावे, या भावनेतून डॉ. टोणगांवकर आपले आरोग्यसेवेचे काम नेटाने करीत आहेत. सर्वच प्रकारच्या रुग्णांना विशेषतः मधुमेह व हृदयविकारच्या रुग्णांना अद्ययावत उपचार देणे, नवनवीन उपचार पद्धती त्यांच्यापर्यंत पोचवणे. हेच आता आयुष्याचे ध्येय आहे. तसेच गरजू रुग्णांना वाजवी दरात व प्रसंगी पूर्णतः निःशुल्क उपचार देणे हा देखील गुण विशेष उल्लेखनीय आहे. रुग्णांच्या आजारावर उपचार करून त्यांचे आरोग्य सुसह्य करणे हा जीवनाचा एकमेव उद्देश ठेऊन टोणगांवकर कार्यरत आहेत. त्यामुळे परिस्थिती नसलेल्या रुग्णांना ते प्रसंगी निशुल्क उपचार करतात. रुग्णसेवा ही एकमेव भावना ते जगतात.
१९९७ मध्ये चालू केलेल्या टोणगांवकर क्लिनिकच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झालेले आहे. ३० ते ४० हजारांहून जास्त मधुमेह, ब्लडप्रेशरच्या रुग्णांना सुयोग्य उपचार त्यामुळे मिळाले आहेत.
Discussion about this post