व्हीएसआरएस मराठी न्युज –
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा व मावळ शिक्षण प्रबोधन परिवार यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड आणि मावळ मधील शिक्षकांचा सत्कार समारंभ प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे रविवारी
आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष आणि मध्यवर्ती नाट्य परिषद मुंबई उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके, पिंपरी चिंचवड मनपाचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गांजाळे तसेच संध्या गायकवाड, सुधीर भागवत, सुदाम वाळुंज, वी. म. शिंदे शोभाताई वहिले, तानाजी महाळुंगकर आणि ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक संतोष पवार आदींसह शिक्षक उपस्थित होते.
यावेळी सोनिया काळोखे, संजय जगताप, सुभाष भानुसघरे, नीता गोगावले संतोष भारती, राजेश डेव्हीड, स्वाती गाडे यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन तसेच राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गांजाळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर प्रेक्षकांसाठी ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक संतोष पवार यांची प्रमुख भूमिका असणारे “यदा कदाचित रिटर्न” हे सध्याच्या राजकीय घडामोडींवर हसत खेळत चिमटे घेणारे आणि ‘शेतकरी आत्महत्या’ या विषयावर मार्मिक भाष्य करीत प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे नाटक सादर करण्यात आले.
राहुल जाधव, गोकुळ लोंढे, अंकुश मोरे, गंगासेन वाघमारे, अजिनाथ शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक राजू भेगडे, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शिवणेकर आणि आभार अमोल चव्हाण यांनी मानले.
Discussion about this post