व्हीएसआरएस मराठी न्युज -सुरेश गादिया मेमोरियल फौंडेशनचे भव्य उदघाटन सोहळा
26 डिसेंबर 2023 रोजी सुरेशजी गादिया ह्यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांच्या आठवणींना उजाळा देत शांती प्रार्थना, सुरेश गादिया मेमोरियल फौंडेशन चे शुभारंभ व वॉटर कुलर चे उदघाटन जैन स्थानकात श्रमणी प.पू. श्री. अर्चनाश्रीजी म.सा. (मीरा) आदी ठाणा 3 यांच्या सानिध्यात करण्यात आले.
प्रवचन मध्ये म.सा. ह्यांनी स्व. सुरेशजी गादिया अमर है, श्रावक कसे असावे व असावे तर स्व.सुरेशजी गादिया सारखे असावे असे 5 महिन्याच्या चातुर्मास दरम्यान आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन सतिश मेहेर, फौंडेशनच्यावती ने प्रकाशजी गादिया यांनी सर्वांचे आभार व मनोगत व्यक्त केले व डॉ अशोकजी पगारिया यांनी सकल जैन समाज पिंपरी चिंचवड तर्फे आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास संदेश गादिया जैन स्थानक चिंचवड स्टेशन चे अध्यक्ष जयप्रकाशजी राका, कार्याध्यक्ष अशोकजी लुंकड, महामंत्री आनंदजी पगारिया व राजेंद्रजी बोरा व अरिहंत सेवा प्रतिष्ठाण व चांदनबाला महिला मंडळ व सर्व सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post