व्हीएसआरएस मराठी न्युज –राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते सजावटीचे उद्घाटन करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या सजावटीचे उद्घाटन करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ चियावटी यांनी ट्रस्टच्या गणेशोत्सवाच्या १३१ व्या वर्षी अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. यावेळी रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, महोत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहसचिव अमोल केदारी, मंडळ अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
,
सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी भक्तांचा सागरच पुण्याच्या रस्त्यांवर उसळतो. प्रमुख गणेश मंडळ कोणते देखावे करणार याची चर्चा पुणेकरांंमध्ये गणेशोत्सवाच्या पूर्वीपासूनच सुरू असते.
या मंडळाकडून यंदा अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराचा देखावा सादर केला जाणार आहे.अमन विधाते हे मुंबईतले कलाकार यंदा राम मंदिराचा देखावा तयार करत आहेत. लोखंडी फ्रेम त्यावर फायबर आकर्षक विद्युत रोषणा याचा वापर करून मंदिर तयार होत आहे. ते हुबेहूब करण्याचा प्रयत्न आहे प्रतिकृतीच्या समोरच्या बाजूस तयार करण्यात येणारा रामसेतू पुण्यात यावेळी फारच गाजेल असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला.
देखाव्यापासून पुढे चौकाकडे रस्त्याच्या मध्यभागातून असा हा सेतू तयार करण्यात येणार आहे.गणेशोत्सवात बाप्पाला काय नैवेद्य दाखवावा? जाणून घ्या शास्त्रया मंदिराच्या सजावटीसाठी यंदा मुंबई, कऱ्हाड, हैदरबाद अशा वेगवेगळ्या भागातले साडेचारशेरेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंडळानं यंदा प्रथमच हे काम पुण्याच्या बाहेरच्या कलाकारांवर सोपवलंय. मंडळाची आजवरची पंरपरा पुढे नेणारा हा देखावा असेल, असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केलाय.मूळ मंदिराप्रमाणेच त्यावरही आकर्षक शिल्पाकृती असतील. मंदिराच्या गुंठावर दशावतार तसेच भगवान सत्यनारायण आणि विठ्ठल यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. गणेश पुराणातील अनेकदृश्य मंदिराच्या भिंतीवर उठावशिल्पांच्या माध्यमातून दाखवण्यात येतील. रामरायांच्या स्वागतासाठी म्हणून मंदिरांच्या दोन्ही बाजूंना वानर उभे असल्याचा देखावाही यंदा करण्यात येणार आहे.
Discussion about this post