व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेले दामिनी पथक सक्षम करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
चिंचवड पोलिस आयुक्तालयात आयोजित जिल्हा नियोजन निधीतून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या ५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे , माजी खासदार अमर साबळे , आमदार महेश लांडगे , दिलीप मोहिते , उमा खापरे , पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे , सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे , अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी आदी उपस्थित होते.
Discussion about this post