व्हीएसआरएस मराठी न्युज – ह भ प श्री रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून आणि सर्वांच्या सहकार्यातून स्थापन झालेल्या देवाची आळंदी येथील श्री संतसेवा आश्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा एकादशीच्या मुहूर्तावर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे.
आळंदीतील जो. म. वारकरी शिक्षण संस्थेच्या पाठीमागे घुंडरे गल्ली येथे हा आश्रम असून उद्घाटनाला साधुसंतांची आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
ह.भ.प. गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुऱहेकर यांच्या आशीर्वादाने पार पडणाऱया या सोहळय़ात ह.भ.प. भास्करगिरी महाराज देवगड, स्वामी अमृताश्रम महाराज जोशी, महामंडेश्वर स्वामी देवानंदजी महाराज काशी, डॉ. ह.भ.प. नारायण महाराज जाधव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली), ह.भ.प. पांडुरंग महाराज वाडेकर, ह.भ.प. वेदांताचार्य बाबूराव महाराज वाघ पंढरपूर, ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळय़ानिमित्त श्री संतसेवा आश्रम, आळंदी येथे पाचदिवसीय कीर्तन महोत्सव 18 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला आहे. यादरम्यान पहाटे 4 वाजता काकड आरती, सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, 9.30 वाजता हरिकीर्तन, दुपारी 2 वाजता लागली समाधी ज्ञानेशाची भावकथा निरूपण, 5 वाजता हरिपाठ आणि रात्री 9 नंतर हरिजागर अशी कार्यक्रमाची रुपरेषा आहे. याशिवाय ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज कदम, ह.भ.प. महंत अमृत महाराज जोशी, ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम, संतसेवा आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्राr यांची कीर्तने होणार आहेत.
Discussion about this post