व्हीएसआरएस मराठी न्युज -शहरात २० नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करणार आहे.
मॅरेथॉन भारतात बंगळूर, मुंबई, दिल्ली आणि पुणे या ठिकाणी होते. यावर्षी पिंपरी-चिंचवड शहर, असे आयोजन करणारे देशातील पाचवे शहर असणार आहे,” असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
क्रीडा विषयक विविध उपक्रम अमलात आणण्याकामी विविध स्पर्धांचे आयोजन करून खेळांची आवड निर्माण करणे, तसेच त्यातून नागरिकांचे आरोग्य जोपासणे आवश्यक आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये शहरातील खेळाडूंनी सहभाग घेऊन शहराचा नावलौकिक वाढवावा, हा या मागील उद्देश आहे. हा मॅरेथॉनचा उपक्रम दहा वर्षांकरिता असून त्याकरिता सुरुवातीचे पहिले तीन वर्षे तीन कोटी रुपये खर्च महापालिकेचा प्रत्येक वर्षी होईल. या मॅरेथॉनचा खर्च भागविण्यासाठी प्रायोजकत्व महापालिका स्विकारणार आहे.
Discussion about this post