व्हीएसआरएस मराठी न्युज –मुळशीतील भूकरमापक पदावर कार्यरत असलेला कर्मचारी रोहन कडू याने बार्सिलोना येथे झालेल्या फूल आयर्न मॅन स्पर्धेत सहभागी होऊन ‘आयर्न मॅन’ हा किताब पटकावला आहे. आयर्न मॅन स्पर्धात तीन प्रकारचे खेळ एकामागे एक सलग करावे लागतात.
यामध्ये आधी स्विमिंग ३.८ किलोमीटर त्यानंतर लगेच सायकलिंग १८० किलोमीटर आणि पाठोपाठ रनिंग ४२.२ किलोमीटर हे एका निर्धारित वेळेत संपवावे लागते. यासाठी तिन्हीही वेगवेगळे म्हणजे स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग यासाठी सुद्धा कट ऑफ दिलेला असतो.
या स्पर्धेत कडू ने स्विमींग १ तास ४२ मि , सायकलिंग ६ तास ५४ मि आणि रनिंग ५ तास ३० मि एवढा वेळ घेऊन संपूर्ण स्पर्धा १४ तास आणि २९ मि म्हणजे निर्धारित वेळेच्या दीड तास राखून आधीच पूर्ण करण्यात आले.
स्पर्धेच्या शेवटच्या क्षणी रोहन ‘You Are An IRONMAN’ असे शब्द Finish लाईन जवळ कानावर पडले तेंव्हा अश्रू अनावर झाले. यासाठी ट्रेनिंग मध्ये ५-६ महिन्याची खूप मेहनत आणि डाएट प्लॅन फॉलो केले.
Discussion about this post