व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) या संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रथमच आज दिनांक ०१ ऑगस्ट, – राष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल, परळी, मुंबई येथे महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स संघटनेच्या विस्तारीत राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.
या बैठकीत जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत व संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
याबैठकीस सरचिटणीस मुकेश तिगोटे, संघटनेच्या कायदेविषयक सल्लागार ॲड. सीमा चोपडा, कार्याध्यक्ष श्री. एच. बी. रावराणे, बंडोपंत वाडकर, सुर्याजी इंगळे, डी. पी. बनसोड, नरेंद्रसिंह राजपूत, श्रीकांत सद्दू, सुषमा सोनटक्के, आशा शेंडे, सारीका शिंदे, रमेश शिंदे, दत्तात्रय तिगोटे, दिपक राऊत, इस्माईल पठाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थितीत होते.
Discussion about this post