व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न आमदार अण्णा बनसोडे कडुन सुरू असतात. शहरात औद्योगिक विकासासोबतच शैक्षणिक व सामाजिक विकास होण्यासाठी आमदार बनसोडे नेहमीच कटिबद्ध आहे.
त्या अनुषंगाने आज जय हिंद स्कुल अँड कॉलेज पिंपरी येथे आमदार बनसोडे यांनी भेट दिली. स्कुल च्या संस्थाचालक गेरा मॅडम यांच्या कडून शाळे मध्ये सुरू असलेल्या कार्याची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकत असताना येणाऱ्या अडचणी व अपुऱ्या सोयी सुविधा जाणून घेतल्या. येणाऱ्या काळात स्थानिक आमदार विकास निधी मधून त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी व विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिला .
यावेळी जय हिंद स्कुल च्या संचालिका गेरा मॅडम, मिरचंदाणी मॅडम, छाब्ररिया मॅडम तसेच नगरसेवक डब्बूशेठ आसवानी, सतीश लांडगे व इतर सहकारी उपस्थित होते.
Discussion about this post