व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे महापालिकेसमोर बेकायदेशीर आंदोलन केल्यामुळे त्यांच्यासह 3 जणांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्येश्वर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे, मिलिंद एकबोटे, किरण शिंदे, विशाल पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहेत. बेकायदेशीर आंदोलन आणि प्रक्षोभक भाषणं केल्यामुळे मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या होत्या. गुन्हा दाखल न केल्यास त्यांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता.
4 सप्टेंबर रोजी पुण्येश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवावे यासाठी महापालिकेबाहेर आंदोलन केलं होतं. चिथावणीखोर भाषण, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याचवेळी भाजप नेते नितेश राणे यांनी देखील यावेळी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप होता. त्यानंतर नितेश राणे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. 4 सप्टेंबरला हे आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र पुढील काही दिवस या सगळ्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नव्हता. अखेर आंदोलन होऊन 22 दिवस झाल्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Discussion about this post