व्हीएसआरएस मराठी न्युज –
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. देशासह राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलने, निदर्शने करत भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षाने देखील काँग्रेसच्या या भूमिकेचे स्वागत करत आंदोलन आणि मोर्चातून भाग घेतला होता. नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे वज्रमुठ सभा पार पडली आहे.
महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा आता नागपूरला होणार आहे. या सभेची तयारी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी भव्य असे मंच उभारले जाणार आहे. भाजपचे केंद्रबिंदू असलेल्या नागपूर भागात महाविकास आघाडीचे सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वज्रमुठ सभेत सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पटोलेंच्या स्वभावावर चर्चा झाली आहे.
Discussion about this post