व्हीएसआरएस मराठी न्युज दि.१० जून-अंकली: श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या निमित्त आज माऊलींच्या अश्वांने श्री क्षेत्र अंकली हुन अलंकापुरी कडे प्रस्थान केले. माऊलींच्या सेवेसाठी सज्ज असणाऱ्या मोती या माऊलींच्या अश्वांने श्री क्षेत्र अंकली ते श्री क्षेत्र आळंदी च्या पायी प्रवासासाठी सुरवात केली आहे. अंकली येथे राजवाड्यात श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांनी अश्व पूजन केले.
श्रीमंत सरदार शितोळे अंकलीकर यांच्या राजवाड्यात श्री देवी अंबाबाई चे आशीर्वाद घेऊन तसेच श्रीमंत शितोळे सरकार यांनी ध्वज पूजन करून माऊलींच्या अश्वांनी पायी
प्रस्थान प्रारंभ केले आहे.अश्वाचे चालक व व्यस्थापक तुकाराम कोळी हे आहेत.अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परंपरागत प्रमुख मानकरी व माऊलींच्या अश्वांचे मालक श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांनी सोशल मीडिया मार्फत प्रसारीत केली आहे.
Discussion about this post