व्हीएसआरएस मराठी न्युज -दिनांक ०३/१२/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढंगळे, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व स्टाफ असे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात चोरघे वस्ती श्री सदगुरु रोझ नर्सरी, सोरतापवाडी. ता.हवेली जि.पुणे येथील सार्वजनिक रोडवर पेट्रोलिंग करीत असताना दोन महिला आपल्या डोक्यावर नायलॉनच्या पांढ-या रंगाच्या पिशव्यांचे सुतळीने बांधलेले बाजके (प्रत्येकी एक-एक पिशवी प्रमाणे) घेवुन जात असताना दिसले.
त्यांना कायदेशिर सोपस्कार पार पाडुन त्यांचकडील पोत्याची झडती घेतली असता एका महिलेच्या ताभ्यात कि.रु. २,०४,९००/- चा १० किलो २४५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व किं.रु.१,०००/- चा एक मोबाईल हॅण्डसेट तसेच दुसरी महिला हिच्या ताब्यात कि.रु. रु.२,०७,३००/- चा १० किलो ३६५ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ असा एकुण कि.रु. ४.१२.२००/- चा २० किलो ६१० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करीता अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता संगणमताने जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६२२/२०२२. एन. डी. पि. एस. अॅक्ट कलम ८ (क), २०(ब) (ii) (क). २९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक धायगुडे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त गुन्हे १ श्री गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.
Discussion about this post