व्हीएसआरएस न्युज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कम्बाईन परीक्षा कधी घेतली जाणार असून, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले होते. MPSC संयुक्त पूर्व परीक्षा तारीख जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दि. ९ एप्रिल, २०१९ रोजीच्या पत्रान्वये सूचना मिळाल्या होत्या.त्यानुसार, ही परीक्षा आयोगाने प्रसिध्दीपत्रक काढत पुढे ढकलली होती.
आता ही परीक्षा ४ सप्टेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल.असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केले आहे.
Discussion about this post